Pune News | बिबट्या बिनधास्त फिरत होता सोसायटीच्या आवारात, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील सिद्धिविनायक सोसायटीत मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट्या (Leopard In Alephata) सावजाच्या शोधात बिनधास्त फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात (Social media) व्हायरल होत आहे. परिसरात बिबट्याचा असलेला वावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune News)

आळेफाटा येथील सिद्धिविनायक सोसायटीला कंपाउंड नसल्याने रात्रीच्या वेळी येथे मोकाट कुत्री आश्रयाला बसतात. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एक बिबट्या थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरला. मोकाट कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट्या आला होता. पण त्याला पाहून कुत्री जिन्यांवरून टेरेसवर पळाली. त्यापाठोपाठ बिबट्याही जिन्याच्या पायऱ्या चढून गेला, पण टेरेस न सापडल्याने तो पुन्हा खाली आला.

बिबट्या सोसायटीमध्ये आल्यानंतर कुत्र्यांनी ओरडण्यास सुरूवात केली. थंडीचे दिवस असल्याने आणि मध्यरात्रीची
वेळ असल्याने सोसायटीमधील लोकांना जाग आली नाही. पण सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्याचा वावर कैद झाला होता. यावरून बिबट्या येऊन गेल्याचे समजले. (Pune News)

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आळेफाटा परिसरात यापूर्वी अनेक ठिकाणी बिबट्याचा वापर दिसून आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका, ”असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक”

Ajit Pawar Group | अजित पवार गटाचे विधीमंडळाच्या नोटिसीला 260 पानी उत्तर, राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचा केला दावा

Pune Pimpri Crime News | पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत, घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या; दोघांना अटक