Pune News | पुण्यात मनसेकडून रोहित शर्मा, विराट कोहलीच्या पोस्टरला दुग्धाभिषेक

पुणे : Pune News | एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ (World Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात क्रिडा प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. आज पुण्यातील कोथरूड येथील मनसे नेते किशोर शिंदे (MNS leader Kishore Shinde) यांच्या नेतृत्वाखाली भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) आणि विक्रमवीर विराट कोहली (Virat Kohli) यांच्या पोस्टरला मनसैनिकांनी दुग्धाभिषेक केला. तसेच भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. (Pune News)

यावेळी कोथरूड मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष शशांक अमराळे म्हणाले, चांगल्या कामाची सुरुवात मंदिरामध्ये जाऊन पूजा, प्रार्थना, दुग्धभिषेक करून केली जाते. त्या प्रमाणेच आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपण पोहोचलो असून ऑस्ट्रियालाचा निश्चितच पराभव करू. अंतिम सामन्यात विराट कोहली शतक मारेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

राणेंचे नाव न घेता जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा, ”तेव्हा दबावामुळे विरोध केला, आता करणार नाहीत”

भाजपा नेत्याचा भुजबळांना इशारा, ‘जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास…’

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संगमवाडी परिसरातील वाहतुकीत बदल