Pune News | उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा, आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना बसणार दुष्काळी झळा

इंदापूर : Pune News | सध्या उजनी धरणात २९.४८ टीएमसी (Ujani Dam Water Storage ) म्हणजेच ५५.०२ टक्के पाणीसाठा आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून एकूण ३.७३ टीएमसी पाणी सोडले होते. पुढील काळात सुद्धा पाणी सोडले जाणार आहे. यामुळे उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्याचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न बिकट होणार आहे. येथे दुष्काळी झळा बसणार आहेत. (Pune News)

सध्या उजनी धरणात २९.४८ टीएमसी म्हणजे ५५.०२ टक्के पाणीसाठा आहे. पाण्याचे प्रसार क्षेत्र २७६.२९ चौरस किलोमीटर आहे. तर पाण्याची पातळी ४९४.५९५ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ९३.१४ टीएमसी एवढा आहे.

गेल्यावर्षी याच तारखेला पाणीसाठा ५९.६२ टीएमसी होता. टक्केवारी १११.२८ एवढी होती. यंदाच्या वर्षी १९ ते २९ ऑगस्ट दरम्यान उजनी धरणातून ३.८० टीएमसी पाणी सोडले होते. २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने चंद्रभागा नदीला पाणी सोडावे लागणार आहे.

तर जानेवारीत माघी यात्रा आहे. या दोन्हीही यात्रेसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी येत असल्याने चंद्रभागेला पाणी सोडावेच लागणार आहे. (Pune News)

सध्या असलेल्या ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यातील थोडा हिस्सा त्यासाठी खर्ची पडणार आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश स्थिती दिसत आहे. माढा मोहोळ पंढरपूर व सोलापूर भागातून पाण्याची
मागणी वाढणार असल्याने उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे.
उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल, हा प्रश्न चिंता वाढवणारा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंनी सरकारला खडसावलं, मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? ‘त्यांचा…’

Gold Silver Latest Rate | सणासुदीला सोने-चांदी महागले! खरेदी जाणून घ्या नवीन दर

Pune Crime News | येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करुन खून, 5 आरोपी ताब्यात