Pune News | पुण्याच्या मंहमदवाडीमध्ये बिबट्याचे दर्शन ! नागरिकांमध्ये घबराट, वनाधिकार्‍यांनी दिली घटनास्थळी भेट (CCTV व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune News) महंमदवाडी (वाडकरमळा) येथे रविवारी एका सात महिन्याच्या वासरचा बिबट्याने (leopard) फडशा पाडला. त्यानंतर आज (मंगळवारी) अंगुल पार्कमधून (Angul Park) बिबट्या गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बिबट्या संरक्षण भिंतीवर उडी मारुन गेला. त्यानंतर बिबट्याच्या पायाचे ठसे संकेत पार्कमध्ये दिसून आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच परिसरातील एका रहिवाशाच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV camera) बिबट्या स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे (Pune News) वातावरण आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

पुण्यातील (Pune News) महंमदवाडी रस्त्यावरील जाधवमळा (Jadhavmala Mahammadwadi Road) येथील अंगुल पार्क लेन दोनमधील एका घरा जवळून बिबट्या गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रात्री दीडच्या सुमारास बिबट्या गेल्याचे दिसत आहे. बिबट्याने संरक्षण भिंतीवरुन उडी मारुन संकेत पार्कमध्ये (Sanket Park) गेल्याचे दिसत असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी मुकेश सणस (Forest Officer Mukesh Sanas) यांनी दिली.

 

संकेत पार्कमधील एका रहिवाशाने सांगितले की, घराजवळून बिबट्या गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
गेल्याआठवड्यात वाडकर मळा (Wadkar Mala) येथील गोठ्यातील एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला होता.
त्यानंतर पुन्हा परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

 

दरम्यान, मागील आठवड्यात वनअधिकारी मधुकर गोडगे (Forest Officer Madhukar Godge) यांनी सांगितले होते की,
हा बिबट्या नसून तरस किंवा कोल्हा असावा. त्यानंतर आज सकाळी परिसरातील नागरिकांना सीसीटीव्हीत बिबट्या दिसला.
हा प्रकार तीन दिवसांनी घडला असून वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला (Pune News) भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी केली. तो बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले.

 

Web Title :- Pune News | Leopard sighting in Pune’s Mohammadwadi! Citizens panic, forest officials visit the spot (CCTV video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS-BJP Alliance | मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याने घेतली फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune Crime | गजा मारणेच्या 4 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!