Pune News : पुणे पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन, 1300 गुन्हेगारांची तपासणी, 5 पिस्तुले जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हेगारांवर पोलिसांची दहशत निर्माण व्हावी यासाठी पुणे पोलिसांच्या तीस पोलीस ठाण्याचे अधिकारी अन गुन्हे शाखेच्या सर्वच पथकांनी एकाच वेळी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात 1 हजार 300 गुन्हेगार चेक तर केलेच पण त्यात अडीचशे गुन्हेगारांना वेगवेगळ्या कलमानव्ये अटक करण्यात आली आहे. तर या कारवाईत 5 पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत.

शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांची झाडाझाडती घेउन कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी रात्री नउ ते एक वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. एकाचवेळी करण्यात आलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळता भुई झाली. गुन्हे शाखेच्या पाच पथकातील अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी शोध मोहिम राबविली. तसेच 1300 जणांना आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने आर्मअ‍ॅक्टनुसार १४२ गुन्हेगारांची कुंडली तपासली आहे. त्याशिवाय विविध टोळीतील ३२८ गुन्हेगारांना तपासले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने पिटा अ‍ॅक्टनुसार १५ जणांना तपासले आहे. दरोडा वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने ४९ वाहनचोर तपासले असता, त्यामध्ये १० गुन्हेगार मिळून आले. जबरी चोरीतील २ गुन्हेगार मिळून आले. शरिराविरूद्धच्या गुन्ह्यात ६ गुन्हेगार मिळून आले आहेत. त्याशिवाय बिबवेवाडीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तडीपार असतानाही शहरात वास्तव्य भोवले तडीपार काळातही शहरात आलेल्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये गुन्हे शाखेने ६ केसेस केल्या आहेत. शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या २१ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीसी १५१ (१)कलमानुसार १६२ गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, गुन्हे शाखेच्या परिमंडळ एक ते पाच पथके, प्रत्येक पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २८ परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक यांनी केली आहे.