Pune News | सणवार आणि उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पोलिस शहर पोलिसांच्या मदतीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | दहीहंडी उत्सव, वीर गोगादेव उत्सव, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची बैठक, गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी बाहेरूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडील पोलिस यंत्रणा परत बोलावून घेण्यात आली आहे. (Pune News)

पुणे शहरातील विविआयपी दौरे, दहीहंडी, वीर गोगादेव उत्सव, विविध परीक्षा, मराठा आरक्षण आंदोलन आणि पाठोपाठ येणार्‍या गणेशोत्सवा आणि ईद ए मिलादमुळे पोलिसांवर पुढील तीन आठवडे बंदोबस्ताचा ताण राहाणार आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त लागणार आहे. शहर पोलिसांनी बंदोबस्तासाठी महापालिकेकडे अतिक्रमण विभागाकडे असलेले सर्व पोलिस मागून घेतले आहेत. आजपासून किमान पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत हे पोलीस व शहर पोलिसांकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त उपलब्ध होणार नसल्याने या कारवाईला तूर्तास विलंब होणार असल्याची माहिती, पोलीस सूत्रांनी दिली. (Pune News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रास्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद राहणार; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’,
भाजपचा हल्लाबोल