Pune News | पुणेरी निषेध ! चुक नसताना गाडी उचलल्याने पठ्ठ्यानं निषेध म्हणून गाडीचं ‘स्मारक’ उभारलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune News) पेठांमध्ये दिसणाऱ्या पुणे पाट्यांमुळे (puneri patya) शहराची ओळख जागतिक पातळीवर गेली आहे. पुण्यातील पुणेरी पाट्यांची नेहमीच चर्चा होत असते. पुण्यात (Pune News) एखाद्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि वेगळे काही करण्यासाठी पुणेकर नेहमीच अग्रेसर असतात. पुण्यातील एका नागरिकाने त्याची गाडी वाहतुक पोलिसांनी (Traffic Police) उचलून नेली. त्याचा निषेध करण्यासाठी त्याने चक्क दुचाकीचं स्मारक उभारलं आहे. तसेच याठिकाणी पाट्यांच्या माध्यमातून पुणे ट्रॅफिक पोलिसांचा (Pune Traffic Police) निषेध केला आहे.

सचिन धनकुडे (Sachin Dhankude) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी उभारलेल्या स्मारकामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करुन आगळा-वेगळा देखावा उभा केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी याठिकाणी आपली दुचाकी ठेवली आहे. सचिन यांची दुचाकी जून महिन्यात ट्रॅफिक पोलिसांनी उचलून नेली होती. ही गाडी 80 दिवसांनंतर त्यांना परत मिळाली. मात्र, यामुळे झालेल्या मनस्तापाचा निषेध (Prohibition) करण्यासाठी त्यांनी हे स्मारक उभं केल्याचे सांगितले.

 

काय आहे हे स्मारक ?

पुण्यातील कोथरुडच्या भुसारी चौकात (Bhusari Chowk Kothrud) हे उभारण्यात आले आहे.
या स्मारकाच्या बांधकामावर त्यांनी आपली दुचाकी ठेवली आहे.
स्मारकाच्या बाहेरील बाजूस त्यांनी वेगवेगळे संदेश देणाऱ्या पाट्या लावल्या आहेत.
यामध्ये ‘भिऊ नकोस, पुढच्या चौकात पोलीस आहे’, ‘पार्किंगचे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘माँ ने कहा शराब छोड दो बाबुजीने कहा घर छोड दो, पीठे बैठी पारू कह रही है सिग्नल तोड दो’, अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यांनी वाहतुकीच्या नियमांविषयी जनजगृती केली आहे.

काय आहे प्रकार ?
सचिन यांनी सांगितले की, 15 जून रोजी नो पार्किंगच्या (No parking) जागेत गाडी लावलेली नसताना देखील ट्रॅफिक पोलिसांनी गाडी उचलून नेली.
त्यानंतर वाहतूक शाखेत जाऊन त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.
तरी देखील पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची दुचाकी त्यांना परत केली नाही.
शिवाय या पोलिसांकडे नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याचा फोटो देखील नव्हता.
अनेकवेळा पाठपुरावा करुन देखील गाडी परत मिळाली नसल्याने अखेर गणेशोत्सवाचं निमित्त साधून त्यांनी भुसारी कॉलनी मित्रमंडळातर्फे ‘गाडीचं स्मारक’ हाच देखावा उभारला.
अखेर वाहतूक पोलिसांनी उचलून नेलेली गाडी 80 दिवासांनी त्यांना परत केली.

Web Titel :- Pune News | pune man constructed his bicycle memorial as ganesh festival decoration

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Time Magazine Top 100 influential list | टाइम मॅगझीन लिस्ट ! जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये PM मोदी, CM ममता बॅनर्जी, ‘सीरम’चे CEO अदर पूनावाला

NSC | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ ‘स्कीम’द्वारे मिळवा टॅक्स बेनिफिट आणि चांगला व्याजदर, जाणून घ्या पूर्ण माहिती

Devendra Fadanvis | OBC आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण’