Pune News : हडपसरमधील बांधकाम प्रकल्पात आकर्षक योजनेचे आमिष दाखवत 26 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात एका बांधकाम प्रकल्पात आकर्षक योजनेचे आमिष दाखवत 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
ऑक्टोबर 2018 ते मार्च 2021 कालावधीत हा प्रकार घडला आहे. यात दोघांना अटक केली आहे.

वैभव पांडुरंग तावरे (वय 29, रा. हडपसर) आणि अमित लक्ष्मण शेंडगे (वय 27, रा. माळवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिरूद्ध घोडके (वय २१, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी डेव्हलपर्सद्वारे मांजरी गोकुळ पार्कमध्ये ४० लाखांत बंगल्याचे मालक व्हा अशी जाहिरात एका वृत्तपत्रात केली होती. त्यानुसार आरोपींनी अनिरूद्ध यांचा विश्वास संपादित करून त्यांना कर्ज काढण्यास प्रवृत्त केले. अनिरूद्ध यांच्याकडून महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या खात्यात २६ लाख रूपये घेतले. पण बंगलो न देता फसवणूक केली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक एम. डी. पाटील करत आहेत.