Pune News | …तर मराठा समजाला आरक्षण देताना अट ओलांडायला काय अडचण?, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation News) मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याच दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारने EWS प्रवर्गाला 10 टक्के आरक्षण देत 50 टक्के आरक्षणाची अट ओलांडली आहे. तर मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही अट ओलांडायला काय अडचण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Pune News)

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या जीआर मुळे मराठा समाजात विभाजन होण्याची शक्यता असून ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण होणार आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), माजी आमदार मोहन जोशी (Congress Mohan Joshi), राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी उपस्थित होते. (Pune News)

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करु नये तसेच समित्यांचे गुऱ्हाळ न घालता ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर आम्हीही त्याला पाठिंबा देऊ. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन चौकशी करावी. लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? कोणत्या स्तरावर दिले गेले? याची चौकशी होईपर्यंत गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मोदी विरोधी पक्ष एकत्र आले असून ‘इंडिया आघाडी’ स्थापन केली आहे. आघाडीमध्ये घटक पक्षांची संख्या सतत वाढत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी विरोधात एकास एक उमेदवार देण्यात येणार आहेत. इंडिया आघाडीमध्ये भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले असून सरकारी कार्यक्रम पत्रिका गुप्त ठेवली आहे. सत्ताधाऱ्यांकडून ज्याप्रकारे गुप्तता बाळगण्यात येत आहे त्यावरुन देशात बेसावधपणे निवडणूका घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Wagle Ki Duniya | सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेतील परिवा प्रणती ऊर्फ वंदना म्हणाली,
भय आणि लोकलज्जेला मागे टाकून ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे

Pashmina – The Thread Of Love | सोनी सबवरील पश्मिना मालिकेत निशांत मलकानी साकारणार व्यवहारचतुर दिग्गज उद्योगपती राघवची भूमिका