Pune News | रात्रीच्या वेळी होणाऱ्या बांधकामाविरुद्ध कारवाई करावी; युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांची पुणे महानगर पालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | शहर आणि महानगर पालिका Pune Municipal Corporation (PMC) हद्दीत रात्रीच्या वेळी चालणाऱ्या बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाळू, क्रशर डम्परमधून खाली करताना होणारा आवाज, बांधकाम सुरु असताना कामगारांचा आवाज, मिक्सरचा आवाज यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री होणारी बांधकामे थांबवण्यात यावीत, तसेच महापालिकेचे आदेश न जुमानणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे (Youth Congress) प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील (Rohan Survase Patil) यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. (Pune News)

“बांधकाम व्यावसायिकांना बांधकामाची परवानगी देताना रात्री-अपरात्री बांधकाम करण्यात येऊ नये, याबाबत महापालिकेकडून परवानगी पत्रावर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचे आढळून येते. याचाच गैरफायदा बांधकाम व्यावसायिक घेतात. याबाबत जाब विचारायला गेल्यास अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना दमदाटीही केली जाते. पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यास पोलीस देखील याची दखल घेत नाहीत, असे दिसून येते. त्यामुळे महापालिकेने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे,” असे सुरवसे-पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Pune News)

“रात्री-अपरात्री चालणाऱ्या बांधकामावेळी निर्माणाधीन इमारत कोसळणे, स्लॅब कोसळणे तसेच इतर दुर्घटना अनेकदा घडल्या आहेत. यात अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी चालणाऱ्या बांधकामाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिक बांधकाम व्यावसायिकांना जाब विचारायला गेले असता त्यांच्यावर दमदाटी करण्यात येते. त्यामुळे महापालिकेने रात्री अपरात्री होणाऱ्या बांधकामाविरुद्ध कडक कारवाई करावी,” असेही त्यांनी नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Fort Competition | पुणे महानगरपालिकेची किल्ले स्पर्धा गुरुवारपासून, विजेत्यांना रोख बक्षिसे

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | सुरक्षारक्षकांची फौज तैनात असताना ‘मार्केटयार्डात’ शेतमालाच्या चोर्‍या वाढल्या; शेतकरी व विक्रेते हवालदील

ACB Trap On Maharashtra Jail Police | लाच घेताना कारागृहाचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, 2 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश