Pune News | पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाला

पुणे / यवत : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | आरोपीला दौंड (Daund) येथे न्यायालयीन कामकाजासाठी नेल्यानंतर तेथून परतत असताना लघुशंकेच्या निमित्ताने आरोपीने यवत (ता.दौंड, जि.पुणे) पोलिसांच्या ताब्यातून फिल्मी स्टाईलने पलायन केले. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) वरवंड पाटस शिवेवर कौटीचा मळा येथे घडली. पळून गेलेल्या आरोपीचे नाव आबासाहेब सुखदेव बागुल (रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगाव जि. जळगाव) असे आहे.

आज शनिवारी (दि. 28) दुपारी 4 वाजता ही घटना घडल्यानंतर पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली.
आरोपी घटना घडली त्याच परिसरातील वरवंड हद्दीतील पाटील वस्ती येथे उसात लपून बसला असल्याने यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 40 पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. स्थानिक ग्रामस्थ सुद्धा यासाठी मदत करत आहेत.

ऊस तोडणीसाठी मजूर देतो असे सांगून आरोपी आबासाहेब बागुल याने 12 लाख रूपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी यवत पोलिसांनी त्याला शुक्रवारी त्याच्या गावातून अटक केली होती.

आज आरोपीला दौंड येथे न्यायालयात हजर केल्यानंतर तेथून परतत असताना त्याने लघुशंकेचा बहाणा करून पळ काढला.
आरोपी ज्या परिसरात लपला आहे तेथे कोणताही विपरीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस काळजी घेत आहेत. तसेच आरोपीला शोधण्याचे काम सुरू आहे.
प्रत्येक शेतात जाऊन परिसर पिंजून काढण्याचे काम सुरू आहे.

तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरात पोलीस स्पीकरवरून सावध राहण्याची सूचना ग्रामस्थांना करत आहेत.
दरम्यान वरवंडचे पोलीस पाटील किशोर दिवेकर यांनी नागरिकांना मदतीचे आहवन केल्याने नागरिक देखील आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मदत करत आहेत.

 

Web Title : Pune News | The accused escaped from police custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | विमानतळ, कोंढवा, हडपसरमधील 12 अवैध धंद्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 11 गुन्हयात 2 लाख 7 हजाराचा माल जप्त

7th Pay Commission | 31 टक्के DA झाल्यास सॅलरीत होईल जबरदस्त वाढ, जाणून घ्या गणित

Pune Corporation | कोरोनाच्या नावाखाली वसुलीचे टार्गेट म्हणजे ‘तुघलकी’ कारभार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांचा प्रशासनावर हल्लाबोल