Pune News : शेतकर्‍यांचा माल विकण्यासाठी मार्केट कमिटी का असू नये : मंत्री सुनील केदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एखाद्या कारखान्यातील माल विकायला दुकान लागते. औषधे विकायला फार्मसी लागते. मग शेतकर्‍यांचा माल विकायला मार्केट कमिटी का असू नये. असा सवाल महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री सुनील केदार यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केदार पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी दालन बंद करणे हे चूकिचे धोरण आहे. मार्केट व बाजार कमिटी जर चुकीचे काम करत असेल, त्यात काही उणीवा असतील तर त्यावर कडक नियम लागू करावेत. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खासगी व्यापारांशी ही स्पर्धा करावी. मात्र कोणतेही जाचंक बिल त्यांच्यावर लादू नये, असेही केदार यांनी यावेळी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी बोलण्यापूर्वी आत्मचिंतन करावे
विरोधी पक्षनेते फडणवीस हे आमचे नागपूरचेच आहेत. त्यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 2014 ते 2019 त्यांचा 5 वर्षाच्या कार्यकाळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याची आकडेवारी त्यांनी बघावी आणि मग बोलावे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे किंवा नाही हे कळेल. त्यांच्या काळात शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात आली होती ती किती लोकांना भेटली. हे देखील त्यांनी पहावे, आधी स्वतः आत्मचिंतन करावे मग आरोप करावे, असे सुनिल केदार म्हणाले.