Pune News : धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही ? – चंद्रकांत पाटील (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असून त्याची दखल घेतली जाईल. असे विधान करणाऱ्या शरद पवार यांनी दुसर्याच दिवशी भूमिका बदलून राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला. रेणू शर्मा यांची चौकशी जरूर करा. पण करूणा शर्मा यांच्याविषयीची माहिती इतके दिवस का लपवली? या मुद्याावरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही?, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

नैतिकतेच्या मुद्द्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्याावा या मागणीवर भारतीय जनता पक्ष ठाम असून या विषयासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद नसल्याचा निर्वाळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्ता सोमवारपासून (१८ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. फडणवीस आणि मी, एकच भूमिका मांडत आहोत. पंकजा मुंडे या देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधातच भूमिका घेतील, याबाबतही माझ्या मनात शंका नाही, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र, निवडणूक प्रतिज्ञापत्रात कौटुंबिक माहिती चुकीची दिल्याप्रकरणी पराभूत उमेदवारानेच न्यायालयात दाद मागितली पाहिजे असे नाही. सामान्य नागरिकही जनहित याचिका दाखल करू शकतो, असे पाटील यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे हवाई सुंदरीने आरोप केल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांना राजीनामा द्याावा लागला होता. आतापर्यंत ज्या नेत्यांवर लैगिक शोषणाचे आरोप झाले त्या सर्वांनी राजीनामे दिले आहेत. मग मुंडे यांना वेगळा न्याय का?, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.