तरुणीचा मोबाईल हिसकाविणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पादचारी तरुणीचा मोबाईल हिसकाविणारा दुचाकीस्वार आणि मोबाइल विकत घेणाऱ्यास लष्कर पोलिसांनी अटक केले. अरबाज अजमल खान (वय २२, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि आफाक अश्पाक शेख (वय २५, रा. मिठानगर कोंढवा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कॅम्प परिसरातून मोबाईलवर बोलत पायी चालली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अरबाजने हिसका देउन तिचा मोबाईल चोरुन नेला. त्यानंतर तो फोन आफाक याला विकला होता. पोलिसांनी शोध घेउन अरबाजला अटक केले. चौकशीत त्याने आफाकला मोबाईल विकल्याची कबुली दिली.