Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’बाधित पुरूषाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं शहरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे तर कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांचं प्रमाण देखील वाढत आहे. अशातच आज (शुक्रवार) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.


गुलटेकडी परिसरात राहणार्‍या 50 वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 15 एप्रिल पासून त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाव्यतिरिक्त त्यास उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. राज्यातील देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.