Pune Parvati Crime | वीजबिल थकल्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, पर्वती परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Parvati Crime | महावितरणचे वीजबिल अपडेट होत नाही असे सांगून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) पर्वती परिसरात राहणाऱ्या 55 वर्षीय ज्येष्ठ महिलेची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याची घटना घडली आहे. याबाबत दांडेकर चौक (Dandekar Bridge) परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेने रविवारी (दि.17) पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) घडला आहे.

महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी महिलेला संपर्क करुन महावितरण कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमचे महिन्याचे वीजबिल अपडेट झालेले नाही असे सांगितले. त्यानंतर वीजबिल बाकी असल्याचे सांगून ते भरण्यासाठी क्विक सपोर्ट नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.(Pune Parvati Crime)

त्यानुसार महिलेने अॅपिलेकेश मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घेतले.
अॅप्लिकेशनचा वापर करुन सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलचा ताबा मिळवला.
त्याद्वारे महिलेची खासगी माहिती चोरून फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 3 लाख 49 हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर
करुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी