Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुण्याच्या हिंजवडीत IPL Cricket मॅचवर Betting घेणार्‍या दौंड (पुणे), अकोट, अकोला, धुळे येथील 6 सट्टेबाजांना अटक; राम भानुशाली, विकास रायसिंग चव्हाण, प्रकाश तेजवाणी AHTU च्या ‘रडार’वर

13 मोबाईल, 2 लॅपटॉपसह 5 लाखाचा ऐवज जप्त

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुण्याच्या हिंजवडी (Hinjawadi) परिसरातील एका फ्लॅटमध्ये बसुन आयपीएल क्रिकेट मॅचवर (Online Betting On IPL Cricket Match) मोठ्या प्रमाणावर बेटिंग घेणार्‍या 6 सट्टेबाजांच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखेतील (PCPC Crime Branch) अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने Anti-Human Trafficking Unit (AHTU) Pimpri मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह एकुण 9 जणांविरूघ्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फ्लॅटमधील 13 मोबाईल, 2 लॅपटॉपसह इतर ऐवज असा एकुण 4 लाख 81 हजार 200 रूपयाचा माल जप्त केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

 

ADV

वैभव बाबराम डिक्कर Vaibhav Babram Dikkar (28, मुळ रा. बजरंगबली मंदिराजवळ, रामटेकपुरा, वॉर्ड नं. 16, अकोट, ता. अकोट, जि. अकोला – Akot Akola), सचिन गंगाराम आजगे Sachin Gangaram Aajge (23, मुळ रा. वसमाल, ता. साकरी, जि. धुळे Sakri Dhule), विकास कैलास लेंढे Vikas Kailas Lendhe (22, रा. राहु पिंपळगांव, पो. कोरेगाव, ता. दौंड, जि. पुणे Daund Pune), ओमकार बिरा भांड Omkar Bira Bhand (20, रा. राहु पिंपळगांव, पो. कोरेगाव, ता. दौंड, जि. पुणे), आशिष निरांजण देशमुख Ashish Niranjan Deshmukh (28, रा. मु. कोळीवेडी, ता. अकोट, जि. अकोला) आणि महेश परमेश्वर काळे Mahesh Parameshwar Kale (33, रा. फ्लॅट नंबर 1, जी-विंग, बिर्ला गेट, अकोला Birla Gate Akola) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार तसेच म्होरके राम भानु शाली (Ram BhanuShali), विकास रायसिंग चव्हाण (Vikas Raysingh Chavan) आणि प्रकाश भगवानदास तेजवाणी (Prakash Bhagwandas Tejwani) हे फरार आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एएचटीयुचे (ATHU Pimpri Chinchwad Police) पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हिंजवडी पोलिस स्टेशनच्या (Hinjawadi Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते (Police Patrolling In Hinjawadi Area). त्यावेळी त्यांना लक्ष्मी चौक ते मारूंजी रोडवरील (Marunji Road) कोलते पाटील प्रोजेक्टच्या (Kolte Patil Project Hinjawadi) जी बिल्डींगमधील 14 व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 1405 मध्ये काहीजण आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली (IPC Cricket Matchver Satta). मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना कळविण्यात आले.

 

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयुच्या पथकाने फ्लॅटवर छापा टाकला असता तेथे वैभव बाबाराम डिक्कर आणि इतर जण हे मोबाईल आणि लॅपटॉपच्या मदतीने लखनौ सुपर जॉइंट विरूध्द कोलकत्ता नाईट राईडर्समध्ये सुरू असलेल्या मॅचवर ऑनलाइन पध्दतीने वेगवेगळया बेवसाईटवर आयडीव्दारे ऑनलाइन क्रिकेट व इतर सट्टा खेळव खेळवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 90 हजार रूपये किंमतीचे 2 लॅपटॉप, 3 लाख 90 हजार रूपये किंमतीचे 13 मोबाईल फोन, एक वायफाय आणि 4 नोटबुक असा एकुण 4 लाख 81 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. पोलिस फरार आरोपी आणि अटक केलेल्यांचे म्होरक्यांचा शोध घेत आहेत.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinay Kumar Chaubey), सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे (IPS Dr. Sanjay Shinde),
अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi), पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr Prashant Amrutkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयुचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Sr PI Devendra Chavan), पोलिस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे (PSI Pradipsingh Sisode),
पोलिस उपनिरीक्षक विजय कांबळे (PSI Vijay Kamble),
पोलिस अंमलदार सुनिल शिरसाठ, पोलिस अंमलदार गणेश कारोटे,
महिला पोलिस वैष्णवी गावडे आणि टीएडब्ल्यूचे Technical Analysis Wing (TAW)
पोलिस अंमलदार नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | 6 bookies from Daund (Pune), Akot, Akola,
Dhule arrested for Online betting on IPL Cricket match in Hinjewadi, Pune; Ram Bhanushali,
Vikas Raysingh Chavan, Prakash Tejwani are on AHTU’s ‘Radar’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा