Pune Pimpri Chinchwad Crime | माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीवर कोयत्याने वार, भोसरी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | घरगुती भांडणानंतर (Domestic Dispute) माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या पतीवर मेहुण्याने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime) दापोडी येथील सिद्धार्थनगर येथे रविवारी (दि.19) रात्री साडे आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन एकनाथ वाघमारे (वय-32 रा. दापोडी) यांनी सोमवारी (दि.20) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार नागनाथ शंकर कांबळे (वय-50) आणि राकेश नागनाथ कांबळे (वय-32 दोघे रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी सचिन वाघमारे हे रिक्षाचालक आहे.
त्यांच्या पत्नीने स्वयंपाक केला नाही या कारणावरुन त्यांनी पत्नीला मारहाण केली.
याच राग आल्याने पत्नी माहेरी निघून गेली. माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यसाठी फिर्य़ादी हे सासरी गेले.
त्यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यात आली.
याचा जाब विचारला असता मेहुणा राकेश याने फिर्यादी यांना हाताने मारहाण करत डोक्यात कोत्याने वार करुन
जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Incident in Bhosari locality where a husband was stabbed with a knife when he went to fetch his wife who had gone home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पिस्तुलासह काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Ahmednagar Crime News | कोपरगावात पोटच्या लेकाचा खून करून आरोपी महिलेने रचला अपहरणाचा बनाव

Kangana Ranaut | दादासाहेब फाळके पुरस्कारांबद्दल कंगना रणौतने नाराजी व्यक्त करत नेपोटीजमवर केली टीका; म्हणाली…