Pune Pimpri Chinchwad Crime | रायडिंग अ‍ॅपद्वारे बुक केलेल्या गाडीतून ‘आयटी’तील महिलेचे अपहरण, नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेची सुटका; हिंजवडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | आयटी कंपनीत नोकरी (IT Company Job) करणाऱ्या एका महिलेने रायडिंग अ‍ॅपद्वारे (Riding App) कार बुक केली. त्यानंतर वाहनचालकाने गाडी दुसऱ्याच मार्गाने नेली. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गाडी एका सिग्नलवर थांबली असता नागरिकांनी महिलेची सुटका केली. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसात ते सव्वासात या कालावधीत बाणेर येथील आर्चिड हॉटेल (Orchid Hotel Baner) ते विद्यापीठ सर्कल (University Circle) येथील आश्रमादरम्यान घडला.

 

याबाबत 44 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) बुधवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उबर अ‍ॅपद्वारे (Uber App) बुक केलेल्या गाडीचालक (एमएच 14 जीयु 9014) योगेश लहानु नवाळे याच्यावर आयपीसी 363, 279, 336, मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी महिलेने 15 दिवसांनी फिर्य़ाद दिली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आयटी क्षेत्रात खासगी नोकरी करतात.
त्यांनी 1 फेब्रुवारी रोजी रायडिंग अॅपद्वारे चारचाकी गाडी बुक केली होती.
त्यावेळी आरोपी योगेश नवाळे हा गाडी घेऊन आला. फिर्यादी या गाडीत बसल्या असता आरोपीने गाडी दुसऱ्या मार्गाने नेली.
याबाबत फिर्यादी यांनी चालकाकडे विचारणा केली असता, त्याने वाहन भरधाव वेगात चालवली.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला.
दरम्यान, सिग्नलवर इतर गाड्या थांबल्याने आरोपीने देखील गाडी थांबवली. त्यावेळी नागरिकांनी महिलेची सुटका केली.
आरोपीने वेगात वाहन चालवून फिर्यादी यांच्या जीवाला धोका निर्माण केला तसेच फिर्यादी यांना जखमी केले.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : – Pune Pimpri Chinchwad Crime | Kidnapping of ‘IT’ woman from car booked through riding app, woman’s rescue due to citizen’s vigilance; Incidents in Hinjewadi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)