Pune Pimpri Chinchwad Crime | सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, सोसायटीमधील लोकांची मुलीसोबत हुज्जत; पिंपरी मधील धक्कादायक प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून सुरक्षा रक्षकाने (Security Guard) तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. तसेच स्वत: आरडाओरडा करुन सोसायटीमधील लोकांना जमा केले. जमा झालेल्या सोसायटीमधील लोकांनी देखील पीडित मुलीसोबत हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) पिंपरी मधील अजमेरा रोडवरील (Ajmera Road) एका सोसायटीत 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

याबाबत पीडित 17 वर्षाच्या मुलीने (Minor Girl) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station)
सोमवारी (दि.6) तक्रार दिली आहे. त्यानुसार सोसायटीचा सुरक्षा रक्षक उमेश (पुर्ण नाव पत्ता माहित नाही)
व सोयायटी मधील 30 ते 40 जणांवर 354, 323, 504, 506, 143, 147, 149 सह पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम
करतो. 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी या त्यांच्या घरात भावासोबत बसल्या होत्या.
त्यावेळी आरोपी हा फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या सोबत गैरवर्तन (Abuse) केले.
तसेच तिच्या चारित्र्याबद्दल अपशब्द बोलून तिचा विनयभंग केला. यानंतर सुरक्षा रक्षकाने आरडाओरडा
करुन सोसायटीमधील नागरिकांना बोलावून घेतले.
सोसायटी मधील लोकांनी पीडित मुलीसोबत हुज्जत घालून तिच्यासोबत भांडण केले.
याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Maltreatment of minor girl by security guard, molestation of girl by society people; Shocking type in Pimpri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांचा डोंबाऱ्याचा खेळ;’ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर घणाघात

Nitin Deshmukh | ठाकरे गटाच्या आमदाराने राणे समर्थकाला दिलेला शब्द पाळला; सांगितल्याप्रमाणे नितीन पाटील नरीमन पॉईंटवर आले अन्…

Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | पोटनिवडणूकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन; कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे यांच्यासह 5 जणांची नियुक्ती