Pune Pimpri Chinchwad Crime News | कोयता गँगची आंबेगावमध्ये दहशत, गाडीला कट मारल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार; 3 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरामध्ये कोयता गँगने (Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात किरकोळ कारणावरुन दहशत पसरवली जात आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे 7 जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर (Minor) कोयत्याने वार करुन परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 14 डिसेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास आंबेगाव बु. येथील वेताळ नगर येथील ओम शांती ओम सोसायटजवळ घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या घटनेत आदित्य संतोष कदम (वय-16 रा. पंचशिल नगर, घोरपडी गाव) जखमी झाला असून त्याने मंगळवारी (दि.19) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मेहबुब उर्फ अल्लादिन शेख (रा. नऱ्हे), शोएब समीर शेख (वय-20 रा. नऱ्हे), प्रतिक कैलास लिहीणार (वय-20 रा. आंबेगाव बु.) यांना अटक केली आहे. तर ओमकार रवी राठोड, ऋषीकेश उद्धव लाखे व इतर दोन जणांवर आयपीसी 326, 504, 506, 143, 146, 149 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. फिर्यादी आदित्य कदम 14 डिसेंबर रोजी रात्री धिरज शेंडगे याच्यासोबत दुचाकीवरुन ओंकार पवळे याच्या फ्लॅटवर जेवण करण्यासाठी जात होता. त्यावेळी आरोपींनी दुचाकीवरुन गाडीसमोर येऊन गाडी आडवली.

आरोपींनी गाडीला कट मारल्याचा बहाणा करुन आदित्य याला शिवीगाळ केली.
तसेच सोबत आणलेल्या कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार करुन
लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले.
तसेच आरडा ओरडा करुन हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात
दहशत निर्माण केली. यावेळी आरोपींनी समोर येईल
त्या व्यक्तीला शिवीगाळ करुन धमकी दिली. पुढील तपास
सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | पंतप्रधान मोदींकडून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची ग्वाही, उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली भेट