Pune Pimpri Chinchwad Crime News | घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | घरगुती गॅसचा (Domestic Gas) काळाबाजार (Black Market) केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (PCPC Police) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) शनिवारी (दि.9) चिखली येथील मोरे वस्ती परिसरात केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगलीवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर रमेश वाघमारे (वय-25 रा. मोरेवस्ती, चिखली), अजय जैन (रा. चिखली), मुकेश ट्रेडर्स, कुदळवाडी, चिखली यांच्यावर आयपीसी 285, 286 सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

चिखली येथील मोरे वस्ती परिसरातील अजय जैन याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार
केला जात असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
पथकाने छापा टाकून 27 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पथकाने केलेल्या चौकशीत सागर वाघमारे याचा मालक अजय जैन याच्या सांगण्यावरुन मुकेश ट्रेडर्स
यांच्याकडून विनापरवानगी छोट्या गॅसच्या टाक्या विकत घेतल्या.
या टाक्यांमध्ये घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडमधुन रिफीलच्या सहाय्याने गॅस भरुन त्याची विक्री केली जात होती.

आरोपी हे बेकायदेशीर रित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोण्यात्या ही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील
गॅस रिकाम्या गॅसमध्ये भरत होते. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हे
बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टी.एस. मस्के (API T.S. Maske) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

BJP MLA Prasad Lad | काळापैशाचा आरोप केल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड संतापले, संजय राऊतांना केली शिवीगाळ, म्हणाले…

CM Eknath Shinde | ”सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ”, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन