Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘दारु पिऊन गुटखा खाऊन घाण का करता’ म्हणून हटकले, दारुड्यांकडून ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दारु पिऊन गुटखा खाऊन घाण का करता असे म्हणाल्याचा राग आल्याने तीन दारुड्यांनी एका 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.11) रात्री दहाच्या सुमारास जुनी सांगवी येथील ढोरे नगर येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत नारायण आत्माराम ढोरे Narayan Atmaram Dhore (वय-61 रा. ढोरे नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार योगेश पिंपरे, निरंजन योगेश पिंपरे, योगेश पिंपरे (सर्व रा. पेटकर चाळ, जुनी सांगवी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील एका मोकळ्या जागेत आरोपी रोज दारु पिऊन (Drinking Alcohol) व गुटखा खाऊ घाण करतात. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना तुम्ही या ठिकाणी मित्र मंडळी घेऊन दारु पिऊन गुटखा खाऊन घाण का करता असे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपी ओंकार पिंपरे याने फिर्यादी यांना हातातील बांबूने डाव्या कानावर मारहाण केली. तर आरोपी निरंजन आणि योगेश यांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच हाताने उजव्या गालावर, पाठीवर, हातावर मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha By Election | निवडणूक आयोग आणि भाजपला हायकोर्टाची चपराक – मोहन जोशी

Pune Lok Sabha By-Election | पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Pimpri Chinchwad Crime News | बिलाच्या पावत्या एडीट करून पैशांचा अपहार, वायसीएम हॉस्पिटलमधील प्रकार

MLA Disqulification Case | आमदार अपात्रता प्रकरण : ‘या’ कारणासाठी विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात राजीनामा, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Winter Session 2023 | संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, अध्यक्षांनी घेतला महत्वाचा निर्णय

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, नेहमीच सर्व महत्वाची पदे अजितदादांना देणं, हीच शरद पवारांची सर्वात मोठी चूक