Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या विधवा पत्नीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राच्या निधनानंतर त्याच्या विधवा (Widow) पत्नीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार (Pune Rape Case) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय नराधमावर पर्वती पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून 15 डिसेंबर 2023 या कालावधीत पर्वती टेकडीवरील जंगलात, महिलेच्या राहत्या घरी तसेच बालाजीनगर येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पर्वती दर्शन येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने शनिवारी (दि.23) पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विशाल विजय कोठवडेकर Vishal Vijay Kothawadekar (वय-40 रा. शुक्रवार पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 377, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

महिला पोलीस उपनिरीक्षक एस.ए. मुळीक (PSI S.S. Mulik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. आरोपी महिलेच्या पतीचा मित्र आहे. महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर आरोपीने महिलेसोबत जवळीक साधली. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवले. तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने महिलेला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
तसेच जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. मुळीक करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सातार्‍यात १२ वर्षाच्या मुलाचा उसाच्या फडात खून; गळा दाबल्याने मृत्यु

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, दागिने अन् पैसेही उकळले; पुण्यातील प्रकार

पुण्यात थंडीचा कडाका वाढला; पाषाणला किमान तापमान प्रथमच 9.7 सेल्सिअसपर्यंत उतरले