Satara Crime News | सातार्‍यात १२ वर्षाच्या मुलाचा उसाच्या फडात खून; गळा दाबल्याने मृत्यु

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime News | कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोर्‍यात असलेल्या हिवरे गावात एका १२ वर्षाच्या मुलाचा उसाच्या फडात गळा आवळून खून (Murder Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Satara Crime News)

प्रणव ऊर्फ विक्रम विजय खताळ (वय १२) असे या मुलाचे नाव आहे. हा प्रकार शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आला. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात (Vathar Police Station) अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Satara Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम खताळ हा शाळेत शिकत होता. शनिवारी सकाळी ११ वाजता शाळेतून घरी आल्यानंतर तो वडिलांबरोबर शेतात गेला होता. सायंकाळी घरी परत येत असताना त्याची चप्पल राहिल्याने वडिलांनी त्याला चप्पल आणण्यासाठी परत पाठविले. बराच वेळ तो परत न आल्याने वडिल त्याला पाहाण्यासाठी शेतात गेले. तेव्हा उसाच्या फडात तो निपचित पडून होता. तो काही हालचाल करत नसल्याचे पाहून त्याच्या वडिलांनी पोलीस पाटलाला कळविले. विक्रम याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तो तपासणीपूर्वी मृत्यु पावल्याचे सांगितले. शवविच्छेदनात त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाठार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, दागिने अन् पैसेही उकळले; पुण्यातील प्रकार

पुण्यात थंडीचा कडाका वाढला; पाषाणला किमान तापमान प्रथमच 9.7 सेल्सिअसपर्यंत उतरले

नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड, जाणून घ्या हल्ल्याचे कारण

लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात