पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ओळखीचा गैरफायदा घेत महिला घरात एकटी असताना तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. याबाबत कोणाला सांगितले तर दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. तसेच आरोपीने महिलेच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत (Minor Girl) गैरवर्तन करत मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दबाव टाकला. याप्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime News) मागील सहा महिन्यापासून सुरु होता.
याबाबत 40 वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दि.2) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सद्दाम उर्फ उजाला जमसेद (वय-35 रा. पिंपरी गांव) याच्यावर आयपीसी 376,376(2-एन), 354 ,354(अ), 323, 504, 506, पॉक्सो ॲक्ट (POCSO Act), आयटी ॲक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला सांगितले तर दोन मुलांना मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच महिलेच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत तिच्याशी लग्न (Marriage) लावून देण्यासाठी फिर्यादी यांच्यावर दबाव टाकला. लग्न नाही लावले तर फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
महिलेचे दोन मुले डबा देण्यासाठी जात असताना आरोपीने मुलांना आडवून त्यांना मारहाण केली.
माझे लग्न तुझ्या बहिणीबरोबर लावून दे नाहीतर दोघांना गायब करण्याची धमकी आरोपीने मुलांना दिली.
महिला तिच्या मुलीसोबत लग्न लावून देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचे फोटो,
अश्लिल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केले. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक बोबडे (Police Inspector Bobde)
करीत आहेत.
Web Title :-Pune Pimpri Chinchwad Crime News | Accused of misbehaving with minor girl and mother, viral photos arrested; Type in Pimpri area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ravikant Shukla | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण
Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट