Pune Pimpri Chinchwad Crime News | चाकण : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने धक्कादायक घटना उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) अत्याचार केल्याची धक्कादायक (Pune Minor Girl Rape Case) घटना घडली असून सदर पीडित तरुणी ही गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा प्रकार खेड तालुक्यातील चाकण येथील एका कंपनीच्या जवळ मे 2023 रोजी घडला आहे. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी (वय-43) चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) मंगळवारी (दि.10) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रंजित साथ करा (वय-23 रा. चाकण, ता. खेड, मुळ रा. पोटकोसेमर पोस्ट, कंजुरा, जि. जयपुर, छत्तीसगड) याच्यावर आयपीसी 376 (2)(एन), 506 सह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्य़ादी यांच्या घराशेजारी राहतो.
त्याने फिर्यादी यांच्या 16 वर्ष 6 महिन्याच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून घेतले.
मुलगी अल्पयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवले.
आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
पीडित मुलगी 12 आठवड्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बीबीएच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कोथरुड एमआयटी मधील घटना

Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रतेवर एक दिवस आधीच सुनावणी, कारण सांगताना राहुल नार्वेकर म्हणाले…

Pune Cyber Crime News | सायबर गुन्हेगारांचे ‘ऑनलाइन टास्क’ पडले महागात, पुण्यातील तरुणाची आर्थिक फसवणूक

Pune Crime News | पॉर्न व्हिडिओ दाखवून 17 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण, 23 वर्षाच्या तरुणाला अटक; कात्रज परिसरातील घटना