Pune Pimpri Chinchwad Crime News | सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार, एकजण ताब्यात; वडगाव शेरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन टोळक्याने एका युवकावर कोयत्याने व दगडांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Pune Police) एका गुन्हेगाराला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.15) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील मारुती नगरमधील बालाजी पान शॉप येथे घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महंमद शमशाद मेहबुब अली (वय-36 रा. मारुती नगर, वडगवा शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन साहिल सय्यद (वय-19), मोन्या भालेराव (वय-19), संतोष पायाळ व त्यांच्या सोबत असलेल्या इतर 4 ते 5 मुलांवर आयपीसी 395, 397, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करुन संतोष पायाळ याला ताब्यात घेतले आहे. आरोपी साहिल सय्यद व मोन्या भालेराव हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हागार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महंमद अली हे पानशॉपमध्ये असताना आरोपी हातात कोयते घेऊन दुचाकीवरुन आरडा ओरडा करत आले. आरोपींनी परिसरात दहशत माजवून फिर्यादी यांच्याकडे सिगारेट मागितली. मात्र, आरोपींनी यापूर्वी घेतलेल्या सिगारेटचे पैसे दिले नसल्याने फिर्यादी यांनी आरोपींकडे पैसे मागितले. याचा राग आल्याने आरोपींनी कोयत्याने व दगडाने दुकानाची व सामानाची तोडफोड केली. तसेच गल्ल्यातील 13 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. महंमद अली याने विरोध केला असता साहिल सय्यद याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या दंडावर वार करुन गंभीर जखमी केले. महंमद अली यांनी याबाबत चंदननगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत संतोष पायाळ याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमरे (PSI Kumare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अश्लील चाळे, वाघोली परिसरातील घटना

वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन रणझुंजार टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 101 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

हॉटेलच्या जागेवरुन कुटुंबाला मारहाण, विनयभंग करणाऱ्या दोन भावांवर FIR; वारजे परिसरातील घटना

स्वर्गीय माजी आमदार विनायक मेटे यांचे पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न