Pune Police MCOCA Action | वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन रणझुंजार टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 101 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | जमिनीच्या विकसनाच्या वादामधून गॅरेजच्या शेडमध्ये लावलेल्या सहा दुचाकी पेट्रोल ओतुन पेटवून देत तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन दत्तात्रय रणझुंजार व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 101 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

जमिनीच्या विकसनाच्या वादामधून टोळी प्रमुख नितीन रणझुंजार व त्याच्या साथीदारांनी गॅरजेमध्ये घुसुन तेथे असलेल्या वॉचमनला धारदार हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गॅरेजच्या शेड मध्ये लावलेल्या सहा दुचाकी वाहनांवर व चारचाकी वाहनांवर पेट्रोल ओतून आग लावली. तर गॅरेज परिसरात पार्क केलेल्या इतर सहा वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच गॅरेजच्या ऑफिसची तोडफोड करुन ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व मोबाईल चोरी केली. हातातील शस्त्र हवेत फिरवून मी एक मर्डर करुन जेलमधुन बाहेर आलो आहे असे म्हणत दहशत पसरवली. हा प्रकार 28 नोव्हेबर रोजी धायरी येथील अंबाईमाता मंदिराजवळ घडला.

याप्रकरणी टोळी प्रमुख नितीन दत्तात्रय रणझुंजार (वय-33 रा. धायरीगाव, पुणे), किरण युवराज भिलारे (वय-21 रा. मारुती मंदिराजवळ, धायरी), हर्षद नामदेव खोमणे (वय-23 रा. नाईक आळी, धायरी) यांच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आयपीसी 397, 435, 506/2, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

आरोपी निती रणझुंजार याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन मागील दहा वर्षात खुन, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दरोडा, दहशत पसरवणे, मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने स्फोटक पदार्थाने आग लावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीने सिंहगड रोड, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली आहे.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार,
सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma),
सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Sr PI Abhay Mahajan),
पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar),
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव (API Praveen Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हॉटेलच्या जागेवरुन कुटुंबाला मारहाण, विनयभंग करणाऱ्या दोन भावांवर FIR; वारजे परिसरातील घटना

स्वर्गीय माजी आमदार विनायक मेटे यांचे पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न

पुणे : लाच स्वीकारताना पुण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात