Pune Pimpri Chinchwad Crime News | मालक कामावरुन काढून टाकणार, भररस्त्यात मालकावर चाकूने हल्ला; वाकड परिसरातील घटना, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कामावरुन काढून टाकणार असल्याच्या रागातून एकाने भररस्त्यात गाडी मालकावर चाकूने हल्ला (Knife Attack) करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.25) सायंकाळी सात ते आठ या दरम्यान वाकड येथील भुमकर चौक (Bhumkar Chowk) वायजंक्शन येथील ट्रॅफिक सिग्नल जवळ घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (PCPC Police) एकाला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत शिवाप्पा आप्पाआन्ना आडागळे (वय-42 रा. आदर्श नगर कॉलनी, मुकाई चौकाजवळ, किवळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दिगंबर शिवाजी गायकवाड (वय-28 रा. मु.पो. डुडुळगाव, आळंदी रोड) याच्यावर आयपीसी 307, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आयशर टेम्पोचे मालक असून आरोपी गायकवाड त्यांच्याकडे चालक म्हणून कामाला आहे. शिवाप्पा त्याला कामावरुन काढणार होते. याची माहिती आरोपी दिगंबरला मिळताच त्याने टेम्पो आणि त्याची चावी देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाले. आरोपीने शिवाप्पा यांच्या डोक्यात टोकदार हत्याराने मारल्याने ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दुचाकीवरुन जात होते.

आरोपी दिगंबर गायकवाड याने शिवाप्पा यांचा पाठलाग केला. भुमकर चौकात सिग्नल पडल्याने फिर्यादी ट्रॅफिकमध्ये
थांबले असता आरोपी पाठीमागून आला. त्याने हातातील धारदार हत्याराने शिवाप्पा यांच्या पाठीत, डोक्यात, मानेवर
वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. या हल्ल्यात फिर्यादी शिवाप्पा जखमी झाले आहेत.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांनी पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरत पालकांना दिला दोष, ”१४ व्या वर्षी हातात मोबाईल…”

Post Viral On Social Media | लवकरच पुलवामा सारखा हल्ला होईल ! सोशल मीडियावर विद्यार्थ्याची पोस्ट; झारखंडमधील विद्यार्थी अटकेत, संरक्षण मंत्री काश्मीर दौर्‍यावर

NCP MP Amol Kolhe | अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू, राज्य सरकारवर ओढला आसूड, ”फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून…”

Solapur Karmala Accident News | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा कार अपघातात मृत्यू; आठ महिन्यांची मुलगी बचावली

Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कोंढवा, अलंकार पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेत नियुक्त्या