Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला, तळेगाव दाभाडे येथील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | केवळ पाहतो या कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्यावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.23) दुपारी दोनच्या सुमारास स्वप्ननगरी गेट नंबर 2 जवळ घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या घटनेत कौस्तुभ किसन जगताप (वय-21 रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) हा जखमी झाला असून त्याने रविवारी (दि.24) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मोहन उर्फ चिक्या शिंदे, शाहरुख शेख, राज साठे, वरुण माने व इतर दोघांवर आयपीसी 307, 341, 143, 147, 148, 149 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौस्तुभ जगताप हा इंद्रायणी कॉलेजमध्ये (Indrayani College) शिक्षण
घेत आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता तो घरी जात असताना त्याने आरोपी मोहन उर्फ चिक्या शिंदे याच्याकडे पाहिले. याच कारणावरुन शिंदे याने त्याची गाडी कौस्तुभ याच्या समोर आडवी लावून त्याला थांबवले. शिंदे याने ‘तु जास्त शहाणा झाला का’ असे म्हणून फिर्यादीच्या कानाखाली मारली.

त्याचवेळी शाहरुख व वरुण हे दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी शिंदे याच्या सांगण्यावरुन कौस्तुभ याला मारहाण केली.
तर राज साठे याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने फिर्यादी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, फिर्यादी यांनी तो वार डाव्या हातावर झेलला. कौस्तुभ जगताप याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांवर
गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक खामगळ (PSI Khamgal) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”