Pune Pimpri Chinchwad Crime News | चांगला परतावा देण्याच्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवडमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तसेच इतर कारणे सांगून एक कोटी 44 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 9 मे 2022 ते आज पर्यंत जय गणेश व्हिजन आकुर्डी येथे घडला आहे. याप्रकरणी परराज्यातील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News )

याबाबत परिक्षित बळवंत नामपूरकर (रा. लोढा बेलमोंडो गहुंजे, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर रिशांत रमेश सिंग (रा.सफदरगंज इन्क्लेव्ह, नवी दिल्ली), संजय सिंग तोमर (रा. जयपुर राजस्थान) यांच्यावर 420, 406, 467, 468, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जय गणेश व्हिजन आकुर्डी येथे ऑफिस आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन आरोपींनी नवीन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून त्याबदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्य़ादी यांनी आरोपींना 60 लाख रुपये दिले. त्याबदल्यात रिशांत सिंग याने बिहार येथील तीन मजली घर तारण ठेवले.

आरोपीने तारण ठेवलेले घर यापूर्वीच दिल्ली येथील एका जोडप्याकडे तारण होते.
फिर्यादी यांनी आरोपींकडे 60 लाख रुपये परत मागितले. त्यावेळी रिक्षांत सिंग
याने कुवेत येथून 24 कोटी 80 लाख 46 हजार 120 रुपये स्वत:च्या खात्यात क्रेडिट करुन घेण्यासाठी
अनेक लोकांना मॅनेज करावे लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादी यांच्याकडून पुन्हा 84 लाख रुपये घेतले. या बदल्यात 4 कोटी रुपये देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. याबाबत दिल्ली येथे समजुतीचा करारनामा (MOU) नोटरी करुन दिला.

यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी पैशांची मागणी केली असता पैसे पाठवल्याचे खोटे मेसेज दाखवले.
आरोपींनी फिर्यादीकडून घेतलेले एक कोटी 44 लाख रुपये त्यांना परत न करता त्यांची फसवणूक केली
असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे तेजस्विनी कदम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Air Pollution | प्रदूषणकारक धुलीकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना न करणार्‍या ६ बांधकाम व्यावसायीकांना महापालिकेची नोटीस

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांपुढे नतमस्तक, म्हणाले – ”पुण्याचं भाग्य की…”