Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘इसको आज खतम करते है’ म्हणत तरुणावर पालघनने वार, खडकी मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्रासोबत दुचाकीवरुन जात असताना फोन आल्याने थांबलेल्या तरुणावर तीन जणांनी हल्ला (Attack) करुन पालघनने वार केले. हा प्रकार रविवारी (दि.31 डिसेंबर) रात्रा साडे नऊच्या सुमारास खडकी येथील पीएमटी बस स्टँड जवळ घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Pune Police) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या घटनेत प्रतीक सपकाळ जखमी झाला आहे. याबाबत शाहरुख सनोबर शेख (वय-21 रा. छाजेडनगर, रेल्वे पॉवर हाऊस जवळ, बोपोडी) याने सोमवारी (दि.1) खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन लेस्ली चार्ली, मेड्या, भुत (सर्व रा. महादेववाडी, खडकी) यांच्यावर आयपीसी 307, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख शेख व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
रविवारी संध्याकाळी शाहरुख हा त्याचा मित्र प्रतीक सपकाळ याच्यासोबत दुचाकीवरुन जात होता.
पीएमटी बस स्टँड जवळ शाहरुखला फोन आल्याने त्याने दुचाकी थांबवली. त्यावेळी आरोपी अचानक त्या ठिकाणी आले.
आरोपी भुत याने ‘पकडो इसको आज खतम करते है’ असे म्हणाला असता आरोपी लेस्ली चार्ली याने प्रतीक याला जीवे मारण्याच्या (Attempt to Kill) उद्देशाने पालघनने तोंडावर वार केले. त्यावेळी शाहरुख याने मदतीसाठी आरडा ओरडा केला असता आरोपी शिवीगाळ करुन पळून गेले. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीला मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Bhandara Sunflag Steel Company Blast | सनफ्लॅग कंपनीतील भीषण स्फोटाने भंडारा हादरला; ८ कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR