Pune Pimpri Chinchwad Crime News | थर्टी फर्स्टच्या रात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळक्याला पर्वती पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तत्कालीन वादातून चार जणांनी दोघांवर प्राणघातक हल्ला करुन खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याची घटना थर्टी फर्स्टच्या (Thirty First) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानमळा वसाहत मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील चार फरार आरोपींना पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एकजण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

हर्षद उर्फ सोन्या शंकर खुळे (वय-20 रा. दत्तवाडी चौकी मागे, दत्तवाडी), तुषार भरत कदम (वय-23 रा. हनुमान नगर, दत्तवाडी), आदित्य शंकर चव्हाण (वय-18 रा. जुना दत्तवाडी रोड, दत्तवाडी), पियुष श्रीकांत गायकवाड (वय-23 रा. हनुमान नगर, दत्तवाडी) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह आर्म ॲक्ट (Arm Act) 4,(25), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत किरण बाळू निमसे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. पोलीस पथक हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, अमित सुर्वे, कुंदन शिंदे यांना माहिती मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी दत्तवाडीतील म्हात्रे पुला (Mhatre Bridge) खाली येऊन थांबले आहेत. त्यानुसार पथकाने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करीत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी हर्षद उर्फ सोन्या शंकर खुळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
त्याच्यावर दत्तवाडी (Dattawadi Police Station), भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात
(Bharti Vidyapeeth Police Station) गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी 31 डिसेंबरच्या रात्री अजून कुठे गुन्हे
केले आहेत का, याचा तपास पर्वती पोलिसांकडून केला जात आहे.

ही कावाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील
(IPS Praveen Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam),
सिंहगड विभाग (Sinhagad Division) सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jairam Paigude),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomne), पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे
(PSI Chandrakant Kamthe), पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, पुरुषोत्तम गुन्ला, दया तेलंगे पाटील,
अनिस तांबोळी, सुर्या जाधव, सद्दाम शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन विनयभंग, फरार सराईत गुन्हेगाराला कोयत्यासह सहकारनगर पोलिसांकडून अटक

अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हातवारे, आरोपीला अटक; धनकवडी परिसरातील प्रकार

शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा, औंध मधील प्रकार

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करुन खून; वारजे पोलिसांकडून पतीला 5 तासात अटक