Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून घरातील सामानाची तोडफोड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रेमसंबंधातून (Love Affair) मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून चार जणांनी घरात घसून सामानाची तोडफोड करुन नुकसान केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.4) रात्री साडे आठच्या सुमारास चिंचवड येथील इंदिरानगर येथे घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका महिलेने सोमवारी (दि.5) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहेत. यावरुन बाळु हसराज भांडे (वय-42), रमेश चंद्रकांत चौधरी (वय-35), शुभम बाळु भांडे (वय-18), ओंकार बालु भांडे (वय-19 सर्व रा. इंदिरा नगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 452, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळु भांडे याच्या मुलीचे आणि फिर्य़ादी यांच्या मुलाचे प्रेमसंबंध आहेत. आरोपीची मुलगी घरातून निघून गेली आहे. फिर्यादी यांच्या मुलानेच प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेली असल्याचा संशय आरोपींना होता. याच संशयातून आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या घरी गेले. त्यांना भीती घालण्यासाठी त्यांच्या घरावर हल्ला केला. तसेच घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आरोपींनी घरातील टीव्ही, कपाट, गॅस शेगडी, होम थेटर, भांडीकुंडी तोडून अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक