Pune Pimpri Chinchwad Crime News | स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, आकुर्डीतील गणेश व्हिजन मॉलमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitute Racket) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने (PCPC Police) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन मॉल (Jai Ganesh Vision Mall) येथील ब्ल्यू स्टोन स्पा सेंटर (Blue Stone Spa Center) येथे करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

राकेश शिंदे (वय-25 रा. पवार चाळ, दापोडी), अक्षय बनकर (वय-30), महिला आरोपी (अंदाजे वय 35) यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार सुनील जगन्नाथ शिरसाट (Police Constable Sunil Shirsat) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथे ब्लू स्टोन्स स्पा नावाने स्पा सेंटर चालवत होते. मात्र आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पीडितांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत स्वत:ची उपजिवीका भागवत होते. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (PCPC Crime Branch) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली.

पथकाने मिळालेल्या महितीची खातरजमा केली असता ब्ल्यू स्टोन स्पा सेंटरमध्य स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय
केला जात असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्याठिकाणी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली.
तसेच तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान (PSI Natha Kekan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”