Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी पैशांची मागणी, एकावर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आज थर्टी फर्स्ट (Thirty First) आहे मला दारु प्यायची आहे. पर्टी करायला मला पैसे दे असे म्हणत एका पंक्चर दुकानदाराला दमदाटी करुन दुकान बंद करण्याची धमकी दिली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) एकावर खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 31 डिसेंबर) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास स्पायरस सांगवी रोडवर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सचिन गोरख ओव्हाळ Sachin Gorakh Oval (वय-40 रा. दापोडी, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय नागटिळक (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 385 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ाद सचिन ओव्हाळ यांचे स्पायरस सांगवी (Spirus Sangvi) रोडवरील नामदेव लॉन्सच्या बाजूला प्रणव स्टोअर्स नावाचे पंक्चर दुकान आहे. रविवारी दुपारी ते दुकानात काम करत असताना आरोपी त्याठिकाणी आला. त्याने आज थर्टी फर्स्ट आहे मला दारु प्यायची आहे. पर्टी करायला मला 200 रुपये दे. मी इथला भाई आहे. मोठे मोठे राजकारणी व अधिकारी माझे मित्र आहेत. तुला याठिकाणी काम करायचे असेल तर मला दोनशे रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही तसेच काम करु देणार नाही, अशी धमकी दिली.
तसेच तुला आता दुकान बंद करावे लागेल अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘आम्ही गाववाले आहोत’ म्हणत टोळक्याकडून महिलेचा विनयभंग, पिसोळी परिसरातील घटना

पुणे : लग्नातील किरकोळ वादातून युवकाला घरात घुसून मारहाण, दोघांवर FIR

खविस चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित