Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : लग्नातील किरकोळ वादातून युवकाला घरात घुसून मारहाण, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राच्या लग्नात किरकोळ कारणावरुन शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी एका युवकाला बांबूने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना गणेशमळा सिंहगड रोड (Sinhagad Road) येथे शनिवारी (दि.30) रात्री साडे दहा ते पावणे अकरा या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी दोघांवर पर्वती पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत कुमार दत्तु खताळ (वय-36 रा. समतानगर, गणेशमळा, सिंहगड रोड, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संतोष केंदळे व सुरज केंदळे (रा. गणेशमळा, सिंहगड रोड) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी फिर्यादी यांचा मित्राचे लग्न होते. या लग्नासाठी कुमार खताळ व त्यांचा मित्र सुजित गेले होते. त्यावेळी त्यांचे आणि आरोपी संतोष केंदळे यांच्यात किरकोळ कारणावरुन शिवीगाळ झाली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. रात्री साडे दहाच्या सुमारास आरोपी कुमार खताळ याच्या घरी गेले.

आरोपींनी खताळ याच्या घराच्या दारावर लाथा मारून फिर्यादी यांची गचुंडी पकडली.
त्यावेळी खताळ यांची आई भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपीने आईच्या तोंडावर मारुन जखमी केले.
तर सुरज केंदळे याने बांबूने खताळ यांच्या डोक्यात मागे मारुन तसेच करंगळीवर मारुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khavis Marathi Movie Poster Released | खविस चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या मंगेश तांबे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 107 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA