Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणेकर नवीन वर्षाचे स्वागतात मग्न, चोरट्यांचा दुकानातील कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यावर डल्ला; रविवार पेठेतील घटना (Video)

3 कोटींचे दागिने व 10 लाख 93 हजार रुपयांची रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात नवीन वर्षाचे (New Year) जल्लोषात स्वागत केले जात असताना दुसरीकडे चोरट्यांनी दुकानातील कोट्यावधी रुपयांचे दागिने (Gold Jewellery) आणि लाखोंची रोकड (Cash) लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रविवार पेठेत घडला असून ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पुण्यातील रविवार पेठेत राज कास्टिंग (Raj Casting) नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान कुलूप लावून बंद असताना दुकानात सध्या काम करणारा कामगार आणि पूर्वी दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी बनावट चावीने दुकानाचे शटर उघडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडली. चोरट्यांनी तिजोरीमधून 3 कोटी 32 लाख 9 हजार 228 रुपयांचे 5 किलो 323 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 10 लाख 93 हजार 260 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

हा प्रकार सोमवारी (दि.1) उघडकीस आला आहे. याबाबत दुकानाच्या मालकाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) सोमवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा (Sr PI Dadasaheb Chudappa) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘इसको आज खतम करते है’ म्हणत तरुणावर पालघनने वार, खडकी मधील घटना

DySP Dalbir Singh | नवीन वर्षाच्या सिलिब्रेशननंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, मिळाला होता अर्जुन पुरस्कार

Hit and Run Law | ‘हिट अँड रन कायदा 2023’ च्या विरोधात देशभरातील वाहतूक संघटनांचे दिल्लीत आंदोलन

जखमी मित्राला नेण्यासाठी आलेल्या तरुणावर वार, कात्रज मधील घटना