Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोन गटात राडा, परस्पर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन नातेवाईक असलेल्या दोन गटात हाणामारी (Fight) झाली. ही घटना शुक्रवारी (दि.8) रात्री काळेवाडी फाटा आणि पवार नगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अमोल भास्कर जावळे (वय-33 रा. पवार नगर, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आते भाऊ संदिप बबन सोनवणे (वय-32 रा. पवारनगर थेरगाव), आशितोष बबन सोनवणे (वय-28 रा. पवारनगर), प्रदीप राजेंद्र शिंदे (वय-30 रा. पडवळनगर, थेरगाव) यांच्यासह इतर तीन ते चार जणांवर आयपीसी 143,146,147,149,324,504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फिर्यादी अमोल यांची आत्या आणि आतेभाऊ संदीप सोनवणे यांनी अमोल यांना फोन करुन भेटायचे असल्याचे सांगितले. ते अमोल यांना भेटण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल (Global Hospital) येथे आले. आपले जुने वाद उद्या बसून मिटवू असे फिर्य़ादी यांनी सांगितले असता संदीप याने अमोल यांचा चुलत भाऊ दुशांत याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दशांत याचे लग्न होऊ देणार नसल्याची धमकी दिली. संदीप याने इतर आरोपींना ग्लोबल हॉस्पिटल येथे बोलावून घेतले. त्यांनी अमोल आणि त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करुन अमोल यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

तर संदीप बबन सोनवणे (वय-32 रा. पवारनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन
अमोल भास्कर जावळे (वय-36 रा. थेरगाव), दोन महिला, दुशांत सुधाकर जावळे (वय-28 रा. पडवळनगर, थेरगाव), रोहन सरोदे (वय-28 रा. गणपती मंदिराजवळ, पडवळनगर, थेरगाव), रोहन गवळी (वय-30 रा. थेरगाव) यांच्यासह इतर तीन ते चार जणांवर आयपीसी 143,146,147,149, 324,504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संदीप याचा मामे भाऊ अमोल याच्या सांगण्यावरुन दोन महिलांनी घरी येऊन त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली.
संदीप आणि त्याची आई ग्लोबल हॉस्पिटल येथे गेले असता तिथे मारहाण केली.
तसेच त्यांचा लहान भाऊ आशुतोष व मावस भाऊ प्रदीप यांना देखील मारहाण केली.
तसेच आरोपींना अडवत असताना त्यांनी काळेवाडी फाटा येथील बीआरटी मध्ये पुन्हा संदीप यांना मारहाण केल्याचे
फिर्य़ादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
दोनही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक जे.एस गिरनार (PSI J.S. Girnar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

BJP MLA Prasad Lad | काळापैशाचा आरोप केल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड संतापले, संजय राऊतांना केली शिवीगाळ, म्हणाले…

CM Eknath Shinde | ”सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ”, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन