Pune Pimpri Chinchwad Crime News | हिंजवडी, महाळुंगे येथे भरधाव वाहनांच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात अपघातांचे (Pimpri Chinchwad Accident News) प्रमाण वाढले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरदिवशी सरासरी एक प्राणांतिक अपघात होत आहे. रस्ते अपघातामध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण जास्त आहे. खराब रस्ते, भरधाव वेगात वाहन चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. हिंजवडी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News )

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Mhalunge MIDC Police Station) हद्दीत झालेल्या अपघतात एका 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत राहुल प्रतापसिंग कुशावह (वय-29 रा. बांदल वस्ती, कुरुळी ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल कुशावह व त्यांची 28 वर्षीय पत्नी बुधवारी (दि.29 नोव्हेंबर) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मोईगावाकडे पायी जात होते. त्यावेळी मोईगावाकडून भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप टेम्पोने राहुल यांच्या पत्नीला जोरात धडक दिली. यामध्ये पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. याप्रकरणी पिकअप चालकावर आयपीसी 279, 337, 338,304 (अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News )

हायवा डंपरच्या धडकेत महिला ठार

भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा डंपरची (एमएच 14 के.क्यु 7281) एका दुचाकीला पाठिमागून धडक बसली.
यामध्ये दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सकाळी साडे दहाच्या सुमारास
म्हाळुंगे गावच्या हद्दीत व्हीटीपी कॅम्प (VTP Camp) येथील नांदे रोडवर झाला. याप्रकरणी जखमी बाळु भाऊ भोसले (वय-68 रा. भोसले वस्ती, मानगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

अपघातात प्रमिला उर्फ संगीता चांगदेव ठाकर यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हायवा डंपर चालकावर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. बाळु भोसले आणि मयत महिला हे दोघेजण दुचाकीवरुन (एमएच 14 बी. डब्ल्यु 7682)
म्हाळुंगे व्हीटीपी कॅम्प मार्गे पाषाण येथे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या हायवा डंपरने
त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. यामध्ये पाठिमागे बसलेल्या प्रमिला ठाकर
यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर फिर्य़ादी यांच्या हात, पाय आणि शरीरावर इतर ठिकाणी मुका मार
लागला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे (PSI Gadve) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, चाकण परिसरातील घटना

कुटुंबाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, चार जणांवर FIR; दापोडी परिसरातील घटना

पिंपरी : विनयभंग करुन पतीला मारहाण, मदतीसाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात घातला दगड; आरोपी गजाआड

Maharashtra MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे गटासाठी सामंत, केसरकर यांची साक्ष महत्त्वाची, अधिवेशन काळातही सुनावणी