Pune Pimpri Chinchwad Crime News | तरुणीची छेड काढून आईला बेल्टने मारहाण, वडगाव शेरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रस्त्याने पायी घरी जात असताना तरुणीचा हात पकडून छेड काढली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या आईला बेल्डने मारहाण (Beating) केली. तसेच तरुणीच्या डोक्यात कर्कटक मारुन गंभीर जखमी केल्याची घटना वडगाव शेऱी येथील दिगंबरनगर येथे शनिवारी (दि.30) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एकावर चंदननगर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 20 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून शाहिद कलीम शेख (रा. वडगाव शेरी) याच्यावर आयपीसी 354 (अ), 324, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी या पायी घरी जात असताना आरोपीने तिचा हात पकडला. ‘तु नेहमी येथून ये-जा करते तु कोठे राहतेस’ असे म्हणत तरुणीला भररस्त्यात मिठी मारली. तरुणीने याबाबत आईला सांगितले. मुलीच्या आईने ‘मुलीची छेड का काढतो’ असे विचारले असता आरोपीने बेल्टने मारहाण केली. त्यावेळी तरुणीने आरोपीला विरोध केला असता त्याने जवळ असलेले लोखंडी कर्कटक फिर्य़ादीच्या डोक्यात मारुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर विनयभंगासह (Molestation) इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक घोरपडे (API Ghorpade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | धर्मांतरण, काळ्या जादुच्या आरोपावरुन वादग्रस्त धर्मगुरुला अटक; नववर्षाच्या पहाटे कारवाई

चालत्या रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्‍लील चाळे, आरोपी तरुणावर FIR; हडपसर परिसरातील घटना