Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : किरकोळ कारणावरुन माजी सैनिकावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पाण्याचा पाईप कोणी फोडला याबाबत विचारणा केली असता सात जणांनी मिळून माजी सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच माजी सैनिकाच्या डोक्यावर कोयत्याने वार (Stabbing Case) करुन गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान रुपीनगर तळवडे (Rupinagar Talwade) येथील श्रीराम कॉलनीत घडली.

अशोक रामकिशन कानडे (वय 48, रा. रुपीनगर, तळवडे) असे जखमी माजी सैनिकाचे नाव असून त्यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिला आणि इतर तीन साथीदारांच्या विरोधात आयपीसी 326, 323, 504, 143, 144, 148, 149. 34 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कानडे हे माजी सैनिक आहेत. आरोपी हे फिर्यादी यांच्या शेजारी राहण्यास आहेत. कानडे यांच्या घराचा पाण्याचा पाईप कोणीतरी फोडला. त्याबाबत कानडे यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेला विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपींनी कानडे त्यांची पत्नी व मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

तसेच कानडे यांच्या डोक्यात कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास पोलीस उपनिरीक्षक पंचमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? पाच खासदारांचे तिकीट कापणार? संजय शिरसाट म्हणाले…

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यावर चाकूने हल्ला, येरवडा परिसरातील घटना

Pune Cheating Fraud Case | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”