Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : पतीला जीवे मारण्याची धमकी, फेसबुक मित्राने उकळले 34 तोळे सोन्याचे दागिने; आरोपी गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | फेसबुकवर ओळख (Facebook Friend) झाल्यानंतर महिलेला भेटण्यासाठी बोलावून तिच्या सोबत फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हयरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच पतीला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन 34 तोळे वजानाचे दागिने घेणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल 2023 ते 22 मार्च 2024 या कालावधीत आकुर्डी (Akrudi) आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.

याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि.23) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन (वय-28 सध्या रा. संकेत पार्क, सय्यदनगर, पुणे मुळ रा. महाविर कॉलनी, विजापुर, कर्नाटक) याच्यावर आयपीसी 384, 386, 500, 501, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Extortion Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आणि आरोपीची ओळख फेसबुकवर झाली. आरोपी हर्बल लाइफ प्रोडक्ट चा व्यवसाय करतो. या व्यवसायाच्या निमित्ताने महिलेला भेटून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला भेटायला बोलावून घेत दोघांचे एकत्र फोटो काढले. काही दिवसांनी आरोपीने दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या पतीला मारण्याची धमकी देऊन 34 तोळे सोन्याचे दागिने घेतले.

फिर्यादी यांनी दागिने परत मागितले असता दागिने देण्यास नकार दिला. तसेच महिलेला धमकावून तिच्या फेसबुकचा पासवर्ड घेतला. पासवर्डचा वापर करुन आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये महिलेचे फेसबुक अकाउंट उघडले. या अकाउंटवर दोघांचे एकत्र असलेले फोटो पोस्ट करुन महिलेची बदनामी केली. महिलेने तक्रार देताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? पाच खासदारांचे तिकीट कापणार? संजय शिरसाट म्हणाले…

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यावर चाकूने हल्ला, येरवडा परिसरातील घटना

Pune Cheating Fraud Case | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”