Pune Pimpri Chinchwad Police News | विभागीय आयुक्तांकडून तडीपारीचा आदेश रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Police News | बंडगार्डन, लोणीकंद व समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शक्ति उर्फ लकी विलास इनरकर याला पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 (DCP) यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार (Tadipaar) केले होते. या विरोधात आरोपीने विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त (Pune Division Divisional Commissioner) सौरभ राव (IAS Saurabh Rao) यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपी शक्ति उर्फ लकी इनरकर याच्यावरील तडीपारीचे आदेश रद्द केले आहेत, अशी माहिती अॅड. प्रशांत पवार (Adv. Prashant Pawar) यांनी दिली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

शक्ति उर्फ लकी विलास इनरकर याला पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 यांनी जुलै 2023 मध्ये तडीपार केले होते. याविरोधात इनरकर याने अॅड. पवार यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. यावर 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत अॅड. पवार यांनी आरोपीची बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून विभागीय आयुक्तांनी निर्णय राखून ठेवला होता. बुधवारी (दि.19) या प्रकरणावर सुनावणी करताना विभागीय आयुक्तांनी शक्ति उर्फ लकी इनरकर याच्या तडीपारीचा आदेश रद्द केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Police News)

अॅड. पवार यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, अपिलार्थी याला न्यायालयाने सर्व गुन्ह्यात जामीन मान्य केला असून कोणताही संबंध नसताना जाणून बुजून व हेतुपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. बंडगार्डन (Bundagarden Police Station) व समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) प्रत्येकी एक गुन्हा न्यायप्रविष्ठ आहे.

तर समर्थ पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे तपासावर आहेत. अपिलार्थी यांच्या संदर्भातील कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे तपास अधिकारी यांनी सादर केले नाहीत. तसेच चार प्रलंबित केसेसमध्ये दोन केसेस या गेली दोन वर्षांपासून तपासावर असून अद्यापही दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले नाही.
अपराध सिद्ध होईपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष असल्याचे गृहीत धरले जाते.
त्यामुळे तडीपारीचा आदेश फेटाळण्याचे आदेश पारीत करावेत असा युक्तीवाद अॅड. पवार यांनी केला.

विभागीय आयुक्तांनी सरकारी व आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून आरोपीचे अपील मान्य केले.
तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी काढलेले तडीपारीचे आदेश संपुष्टात आणण्यात येत असल्याचे आदेश दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Police News | शिक्के चोरून बनवले बनावट फिटनेस सर्टिफिकेट, एकाला अटक; ससून हॉस्पिटलमधील प्रकार

Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Ajit Pawar Group | आव्हाडांनी मारलेला बाण अचूक लागला! भाजपा-आरएसएस बैठकीच्या दाव्यानंतर अजित पवार गटाला कळ

Police Accident News | नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू