Pune Pimpri Crime | शस्त्र परवान्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 9 लाखांची फसवणूक; वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | मी मुंबई मंत्रालयात (Mumbai Mantralaya) असतो, गृह विभागातील (Home Department) कामे पाहतो असे सांगून तुम्हाला शस्त्र परवाना (Arms License) मिळवून देतो असे सांगून एका व्यावसायिकाला 9 लाखांचा गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) जानेवारी 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत तापकीरनगर, काळेवाडी येथे घडला आहे.

याबाबत प्रसाद उर्फ दिगंबर तुकाराम फुगे Prasad alias Digambar Tukaram Fuge (वय 27, रा. भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) शुक्रवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राज उर्फ धनराज बाळू गायकवाड Raj alias Dhanraj Balu Gaikwad (वय 30, रा. कडवळवस्ती, लोहगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा पार्ले जी बिस्कीट (Parle G Biscuit), मार्लबोरो सिगारेट डिस्ट्रीब्यूटर (Marlboro Cigarette Distributor) तसेच शेती व्यवसाय आहे. त्यांना स्वसंरक्षणाकरिता आर्म लायसन्स पाहिजे होते. यासाठी त्यांनी मुंबई मंत्रालयातील गृह विभागात अर्ज केला होता. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांचा मित्र नितीन भोसले याची ओळख सांगितली. तसेच तुम्हाला शस्त्र परवाना मिळवून देतो असे सांगून फिर्यादी यांचा मावस भाऊ मयूर गवळी याच्या घरी बोलावून घेतले.

फिर्यादी हे भावाच्या घरी गेले असता, आरोपीने मी मुंबईत मंत्रालयात असतो. मी गृह विभागातील कामे पाहत असतो.
मला तुमची फाइल मिळाली त्यावरून मी तुमचा फोन नंबर घेऊन संपर्क केल्याचे सांगितले.
तसेच मी शहरात अनेकांना शस्त्र परवाना मिळवून दिला असून,
तुम्हालाही पाच ते सहा महिन्यांत शस्त्र परवाना मिळवून देतो असे सांगितले.
फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन असे 8 लाख 63 हजार रुपये दिले.
पैसे देऊनही आरोपीने शस्त्र परवाना मिळवून न देता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | 9 lakh fraud of a businessman on the pretext of arms license; Incidents in Wakad area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

CM Eknath Shinde | फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची दखल नरेंद्र मोदींनी घेतली; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती