Pune Pimpri Crime | ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात ! इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेला 40 लाखाचा गंडा घालणारा भामटा राकेश चहर सांगवी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेला 40 लाख 67 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. महिलेची फसवणूक (Fraud) करणाऱ्या भामट्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. राकेश कुमार हाकींगसिंग चहर (Rakesh Kumar Haking Singh Chahar) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मे 2021 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला होता.

 

आरोपी राकेशकुमार हाकींगसिंग चहर (वय- 36 रा. उंड्री, मुळ रा. कांतुरलिम कुर्का गोवा) याने मे 2021 मध्ये फिर्यादी याच्यासोबत इंस्टाग्रामवर ओळख केली. यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले. त्यानंतर त्यांने आपण श्रीमंत आहोत, असे महिलेला भासवले. तसेच राकेशकुमारचे लग्न झाले असताना देखील त्याने फिर्यादीपासून ही माहिती लपवून ठेवली. त्याने फिर्यादी महिलेस लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि चांगल्या मिठीई शॉपची फ्रँचाईसी (Sweet Shop Franchise) घेऊन व्यवसाय करण्यासाठी वेळोवेळी तिच्याकडून रोख स्वरुपात आणि बँक ट्रान्सफरद्वारे पैसे उकळले. तसेच राकेश कुमारने फिर्यादी महिलेला बँकेतून कर्ज घेण्यास भाग पाडले. महिलेने घेतलेल्या कर्जाची रक्कम घेऊन 40 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केली. (Pune Pimpri Crime)

 

महिलेने आरोपी चहर याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली. पोलिसांनी आयपीसी 420, 406 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हा (FIR) दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक (Arret) केली आहे. आरोपीला न्यायालयात दाखल केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने अशाच प्रकारे शादी डॉट कॉम (Shaadi.Com), इन्स्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल माध्यमातून महिलांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर सांगवी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल तांबे करीत आहेत.

 

या नंबरवर संपर्क साधावा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे – 9823027522, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल तांबे – 9823079852, पोलीस हवालदार विशाल चौधरी – 9823709486

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole),
सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disale),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे (Senior Police Inspector Sunil Tonpe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल तांबे (Inspector of Police Sunil Tambe),
पोलीस हवालदार विशाल चौधरी, राजेंद्र शिरसाट, नितीन काळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Acquaintance turns into friendship and love! Bhamta Rakesh Chahar Sangvi, who cheated a woman of 40 lakhs through an acquaintance on Instagram, is in the police net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा