Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका 21 वर्षाच्या तरुणीवर बळजबरीने बलात्कार (Rape) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. आरोपी मुनीर मुजावर (Munir Mujawar) याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने वकिलांमार्फत (Pune Pimpri Crime) जामिनासाठी अर्ज केला होता. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे (Pune District and Sessions Court Judge V.A. Patravale) यांनी आरोपीला जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.

 

काय आहे प्रकरण ?

आरोपी मुनिर मुजावर व फिर्यादी नातेवाईक असून यांच्यात नातेसंबंधातून मैत्री होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले. एके दिवशी आरोपी फिर्यादीच्या घरी आला व घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन, तसेच लग्नाचे खोटे आमिष दाखवून बळजबरीने इच्छा नसताना सलग दोन दिवस बलात्कार केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून सांगवी पोलीस ठाण्यात आयपीसी 376, 376 (2)(n) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला होता. आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला 8 जून पासून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. (Pune Pimpri Crime)

 

आरोपीच्या वतीने वकील अ‍ॅड. राकेश सोनार (Add. Rakesh Sonar) व अ‍ॅड. महेश देशमुख (Adv. Mahesh Deshmukh) यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर युक्तिवाद करताना आरोपीचे वकीलांनी या गुन्ह्यातील आरोपी व फिर्यादीचे शारीरिक सबंध हे प्रेमातून तसेच संगणमताने प्रस्थापित करण्यात आलेले आहेत. लग्नाचे आमिष हे ज्या वेळी दिले त्यावेळी ते पूर्ण करण्याच्या हेतूनेच दिले होते. फिर्यादीच्या मागील प्रेमप्रकरणातून आरोपी मुनिर मुजावर व फिर्यादी यांच्यात वाद होता याच वादाच्या रागाने फिर्यादिनी खोटी केस दाखल केली होती, असा युक्तिवाद अ‍ॅड. राकेश सोनार व अ‍ॅड. महेश देशमुख यांच्या कडून करण्यात आला व्ही. ए. पत्रावळे कोर्टाने युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीचा जामीन मंजूर केला.

 

 

Web Title :-  Pune Pimpri Crime | Bail granted to accused of raping a girl on the pretext of marriage

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा