Pune Pimpri Crime | विवाहेच्छुक महिलेची 12 लाखांची फसवणूक; चिखली परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नासाठी वधू-वर सूचक मंडळात नावनोंदणी केलेल्या महिलेला संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नापूर्वी पूजा-अर्चा करायच्या असल्याचे सांगून 12 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 1 डिसेंबर 2022 या कालावधीत चिखली येथे घडला. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) उत्तराखंड येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत 36 वर्षांच्या महिलेने गुरुवारी (दि.1) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल शर्मा (रा. जोहारीपूर, उत्तराखंड) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वत:च्या लग्नासाठी माळी वधू-वर सूचक मंडळामध्ये नावनोंदणी केली आहे.
आरोपीने फिर्यादी यांचा मोबाइल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला.
आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून लग्न जमवण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी पूजा-अर्चा करावी लागणार असल्याचे सांगितले.
त्यासाठी आरोपीने महिलेकडून वेळोवेळी 12 लाख 17 हजार 120 रुपये घेतले.
पैसे दिल्यानंतर आरोपीने लग्न न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदळे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Cheating Of 12 Lacs With Woman Incident In Chikhali Are

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत