Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | शेजारी राहणाऱ्या महिलेचा नंबर मिळवून तिच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आणि ई-मेलवर अश्लील व्हिडिओ (Obscene Video), मेसेज पाठवून त्रास दिला. तसेच अश्लील बोलून महिलेचा हात पकडून तिच्या मनला लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) निगडी प्राधिकरणात (Nigdi Pradhikaran) 18 जुलै 2021 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

 

याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) शुक्रवारी (दि.18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 39 वर्षीय आरोपीविरुद्ध आयपीसी 354 (ड), 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने दुसऱ्या शेजाऱ्याकडून फिर्यादी यांचा नंबर मिळवला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला ई-मेल व व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवून अश्लील भाषेत बोलला.
यानंतर आरोपीने महिलेचा हात पकडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग (Molestation) केला.
तसेच महिलेच्या पतीला आणि मुलांना शिवीगाळ करुन धमकी (Threat) देत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केकाण (PSI Kekan) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Incident in Pimpri Chinchwad area of rape by sending obscene video to a woman living next to the house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

Pune Crime | मार्केटयार्ड येथे गोळीबार करुन दरोडा घालणाऱ्या 3 फरार आरोपींना पिस्टलसह अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई